दापोली न.पं. कडून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

दापोली : दापोली नगरपंचायत मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दंड वसूलीची धडक मोहीम सुरू केली आहे. न.पं. प्रशासनाकडून मास्क न घालता संचार करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यासाठी कडक मोहीम सोमवारी सकाळपासून शहर परिसरात सुरू केली होती. उपनगराध्यक्ष प्रशांत पुसळकर यांनाही ५०० रुपये दंड आकारून पावती देण्यात आली आहे. ही दंड वसुली वसुली मोहीम सोमवार सकाळपासून उत्तम प्रकारे कर्मचाऱ्यांनी सुरू केली असून पहिल्या दिवशी तब्बल चौदा हजार रुपये दंड वसूल झाला आहे. जवळपास २८ जणांकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे. नगरपंचायत कडून आसऱ्याच्या पुलावर, बाजारपेठेत व परिसरात सिव्हील ड्रेस पथक कार्यरत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:26 PM 30-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here