आम्ही चिनी सरकारला भारतीयांची माहिती दिलेली नाही; TikTok चे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने Tiktok, शेयर इट यांसारख्या ऍपसह जवळपास 59 App वर अधिकृत बंदी घालत चीनवर डिजिटल स्ट्राईक केल्याची चर्चा होत आहे. असं असतानाच बंदीचा निर्णय येताच आता TikTok इंडियाकडून काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. TikTok च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन आपण चीनच्या सरकारला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नसल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. ‘भारत सरकारनं जारी केलेल्या 59 ऍप ब्लॉक करण्याच्या अंतरिम आदेशामध्ये टिक टॉकचाही समावेश आहे. आम्ही या आदेशाचं पालन करत आहोत. सदर प्रकरणी आम्हाला सरकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीचं बोलावणं आलं आहे. जेथे आमची बाजू मांडत स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार आहे. संरक्षित बाबी आणि डेटा प्रायव्हसीबाबतच्या सर्व अधिनियमांचं टिक टॉकनं पालन केलं असून आमच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती परदेशी आणि चिनी सरकारला देण्यात आलेली नाही. भविष्यातही असं केलं जाणार नाही. ऍपच्या वापरकर्त्यांची गोपनीयता आणि अखंडता यालाच आम्ही प्राधान्य देतो’, असं निखिल गांधी यांच्या नावे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:03 PM 30-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here