रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन मध्ये पुढील गोष्टी बंद राहणार

रत्नागिरी : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १ जुलै पासून ८ जुलैपर्यंत आठ दिवसांसाठी जिल्ह्यात लॉक डाऊन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यादरम्यान, जिल्ह्यात लॉकडाऊन मध्ये पुढील गोष्टी बंद राहणार आहेत :

1. सर्व व्यक्तींना घरातून बाहेर पडणेस प्रतिबंध करण्यात येत आहे.

2. रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व सिमा बंद राहतील (अत्यावश्यक सेवा वगळून)

3. सर्व प्रकारची प्रवासी वाहतुक (दुचाकी वाहने, तीन चाकी वाहने, रिक्शा, जीप, टॅक्सी, कार, बस) बंद राहील. (अत्यावश्यक सेवा वगळून)

4. अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने / आस्थापना वगळून अन्य सर्व दुकाने / आस्थापना बंद राहतील.

5. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमा होता येणार नाही.

6. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी प्रवास करतेवेळी मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.

अत्यावश्यक सेवेसाठी सार्वजनिक ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास सामाजिक अंतर किमान 6 फूट ठेवणे आवश्यक राहील. दुकानावर एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहक उपस्थित राहणार नाहीत.

7. मोठया प्रमाणात जमाव जमेल अशा कृती करण्यास प्रतिबंध राहील.

8. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास मनाई करण्यात येत आहे. अशी बाब आढळल्यास कायदेशीर शिक्षा करण्यात येईल.

9. सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू इत्यादींच्या सेवनास प्रतिबंध करण्यात येत आहे.

10.कामाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनर, हात धुण्याचा साबण, सॅनिटायझर हे प्रवेशाच्या ठिकाणी उपलब्ध ठेवणे संबंधीत आस्थापना प्रमुखावर बंधनकारक राहील.

11. कामाच्या ठिकाणी सार्वजनिक वापर करून असणारया जागा सतत निर्जंतुक कराव्यात.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:12 PM 30-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here