रत्नागिरी शहरात रस्ते दुरुस्ती सुरु

0

रत्नागिरी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने रत्नागिरी शहरातील खड्ड्यांच्या विरोधात आक्रमक होऊन त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून शहराचे चित्र प्रकाशात आणल्यानंतर रत्नागिरी नगर परिषद खडबडून जागी झाली. ‘स्वाभिमान’च्या दणक्यामुळे शहरातील खड्ड्यांची डागडूजी सुरू झाली आहे. मोठ्या विश्वासाने ज्या शिवसेनेकडे रत्नागिरीच्या शहरवासीयांनी रत्नागिरी शहराचा कारभार दिला त्या शिवसेनेने जनतेचा भ्रमनिरास केला. पिण्याचे पाणी, कचरा निर्मलन, मोकाट गरे आणि शहरातील प्रत्येक रस्त्यावरील खड्डे यामुळे जनता बेजार झाली आहे. मात्र जनतेला काहीही फरक पडत नाही असे गृहित धरून पालिकेचा कारभार सुरू होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष जनतेचा आवाज झाला. या खड्डे,कचरा आणि मोकाट गुरे या समस्यांचे अनोखे आंदोलन स्वातंत्र्यदिनी केले. यामध्ये रत्नागिरीतील प्रत्येक रस्त्यावरील खड्डे, कचरा आणि गुरे यांची छायाचित्रे काढून त्याचे प्रदर्शन शहरात भरविण्यात आले होते. यातूनच द्विशतकाकडे वाटचाल करणाऱ्या पालिकेचा कारभार करणाऱ्या शिवसेनेच्या कारभाराचे विदारक चित्र शहरवासीयांना पाहायला मिळाले. नागरिकांनी या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिला. उत्स्फूर्त प्रतिक्रियाही दिल्या, याच पार्श्वभूमीवर जागी झालेल्या रत्नागिरी नगर परिषदेने शुक्रवारपासून शहरातील खड्ड्यांच्या डागडुजीला सुरूवात झाली आहे. शहरातील ८० फूटी रस्त्यावर ही डागडुजी सुरू झाली असून ‘स्वाभिमान’च्या अनोख्या आंदोलनामुळे पालिका सत्ताधारी जागे झाल्याबद्दल जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here