सावर्डे बाजारपेठ आजपासून आठ दिवस बंद

चिपळूण : कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन सावर्डेतील व्यापारी संघटनेच्यावतीने मेडिकल दुकाने वगळता सर्व बाजारपेठ आजपासून ते दि. ८ जुलेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ना. उदय सामंत व जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केलेल्या ‘ब्रेक द चेन’ला प्रतिसाद देत सावर्डेतील व्यापारी एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर आठ दिवस किराणा मालासहित सर्व बाजारपेठ बंद राहणार आहे. केवळ मेडिकल्स उघडी राहणार असल्याचे सांगण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:20 AM 01-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here