रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे कोकण प्रभारी आ. प्रसाद लाड आज शनिवारी रत्नागिरी दोऱ्यावर येत असून रत्नागिरीतील पूरग्रस्त गावांना आ. लाड प्रत्यक्ष भेट देणार आहेत. तसेच या पूरग्रस्त भागाचा दौरा करून आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहेत. आ. लाड यांच्या उपस्थितीत संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी नगराध्यक्षाची निवडणूक तसेच अनेक महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे २९ ऑगस्ट व ३० ऑगस्ट रोजी रत्नागिरी व चिपळूण येथे होणाऱ्या महाजनादेश यात्रेचे नियोजनसुध्दा यावेळी करण्यात येणार आहे. तर चिपळूण, गुहागर, दापोली, खेड येथील प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन पक्षप्रवेशासंबंधीही चर्चा यावेळी होण्याची शक्यता आहे.
