बेकायदा होर्डींग वरून नगरपालिकांची कानउघाडणी

0

मुंबई : शहरांमध्ये रस्तोरस्ती दिसणाऱ्या होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि फ्लेक्सच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा महापालिका आणि नगर परिषदांना फैलावर घेतले असून, गेल्या सहा महिन्यांत याबाबत काय कारवाई केली आणि किती जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, याचा तपशील सादर करण्याचे निर्देश राज्यभरातील पालिका नगर परिषदांना दिले आहेत.

बेकायदा होर्डिंग्ज, फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्ससंदर्भात २०१७ मध्ये देण्यात आलेल्या निर्देशांचे किती पालन करण्यात आले, याचाही अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांना दिले. सहा वर्षांपूर्वी न्यायालयाने आदेश देऊनही महापालिका बेकायदा होर्डिंग्ज, पोस्टर्सवर कारवाई करत नाही. यावरूनही न्यायालयाने सर्व नगरपालिकांना खडसावले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 02-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here