रत्नागिरी : गेली दोन वर्ष बुरंबी ते देवशेत फणसवळे या संपूर्ण रस्त्याचे नवीन डांबरीकरण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याकारणाने श्री.पंकज सपतीस्कर सोबत स्थानिक ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्या उपोषणास भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजेश सावंत यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन जिल्हा परिषद व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यातून योग्य तो मार्ग काढून उपोषणकर्त्यांना न्याय देऊन उपोषण थांबवले.
त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या रस्त्याच्या कामाबाबत असलेल्या सर्व अडचणी जिल्हा परिषद अधिकारी यांच्याशी बोलुन तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्याशी चर्चा करून सोडविल्या व उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांना न्याय देऊन उपोषण थांबविले.
सदर उपोषणा बाबत चर्चेसाठी प्रदेश उपाध्यक्ष भाजप अतुल कळसेकर, जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, संगमेश्वर दक्षिण तालुका अध्यक्ष रुपेश कदम, विनोद म्हस्के विवेक सुर्वे, उमेश देसाई, संकेत कदम अमोल गायकर हे भाजप कार्यकरते उपस्थित होते. संबंधित गावातील सर्व नागरिकांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 03-11-2023
