रत्नागिरी : जळगाव येथे आदिवासी कोळी जमातीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमनच्या रत्नागिरी शाखेच्यावतीने शुक्रवारी (ता. ३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायंकाळी ४ ते ५ या कालावधीत निदर्शने करण्यात येणार आहेत.
जळगाव येथे कोळी समन्वय समितीतर्फे १० ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे, या मुख्य मागणीसाठी ८ कोळीबांधव अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करत आहेत. अधिसंख्य पदाच्या सेवालाभ लाभाच्या १४ डिसेंबर २०२२ च्या शासननिर्णयात त्रुटीचे शुद्धीपत्रक काढण्यात यावे. यासाठी ऑफ्रोह ठाणेच्यावतीने २६ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला समर्थन व शासनाला पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यासाठी ऑफ्रोहच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 03/Nov/2023
