पुणे : पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता वाढल्याने राज्यात फक्त कोकणात शुक्रवारपासून (दि. ३) चार दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. तसेच राज्यात पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढल्याने कोकणात तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र, उर्वरित राज्यात वातावरण कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 03-11-2023
