चिपळूण : ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरच्या वतीने संसर्ग प्रतिबंध सप्ताह चिपळूण येथे साजरा करण्यात आला. या निमित्ताने रुग्णालयात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संसर्ग प्रतिबंध कशाप्रकारे रोखता येईल, तसेच हात स्वच्छतेबाबतही मार्गदर्शनपर व्याख्यान आणि याविषयावर पोस्टर मेकींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ७० हून अधिक डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी संक्रमणास प्रतिबंधक करणाऱ्या पद्धती दर्शविणारे पोस्टर्सही प्रदर्शित करण्यात आल्याची माहिती डॉ. प्रसाद कवारे यांनी दिली. यावेळी सचिन देशमुख म्हणाले, संक्रमणास प्रतिबंध करण्याचा तसेच संक्रमण नियंत्रणाकरिता योग्य पध्दतीने हात धुण्याचे तंत्र अतिशय उपयुक्त ठरेल, असे सांगितले. या कार्यक्रमाला ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटर ग्रुपचे उदय देशमुख (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) सचिन देशमुख (व्यवस्थापकीय संचालक), डॉ. प्रताप राजेमहाडिक ( संसाधन संचालक), अर्पित कोहली (मुख्य कार्यकारी अधिकारी), डॉ. तेजल गोरासिया (वैद्यकीय संचालक), डॉ. मनोज लोखंडे (सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट) आणि डॉ. प्रसाद कवारे (संसर्ग नियंत्रण अधिकारी) उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 03/Nov/2023
