Ratnagiri : एनसीसी विद्यार्थ्यांची १५ नोव्हेंबरपासून नौकाभ्रमण मोहीम

0

रत्नागिरी : २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी विद्यार्थ्यांची १५ नोव्हेंबरपासून २४ नोव्हेंबरपर्यंत सागरी मार्गातून कोकण शौर्यच्या माध्यमातून नौकाभ्रमण करणार असल्याची माहिती २ नेव्हल युनिट मोहिमेचे कमांडिंग ऑफिसर के. राजेशकुमार यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार दिली. परिषदेत दिली.

गेले अनेक वर्षे कोकणच्या समुद्रामध्ये एनसीसीचे विद्यार्थी नौका भ्रमण करुन आपल्या शिक्षणाचा पुरेपूर फायदा घेत आहेत. त्यासाठी त्यांची मेहनत आणि अधिकाऱ्यांचे कष्ठ सार्थकी ठरतात सेकंड नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर के. राजेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नेव्ही, एअरफोर्स व आर्मीचे ६० विद्यार्थी या मोहिमेत सहभागी होणार आहेत. कोकण शौर्य सागरी नौका भ्रमण मोहीम दि. १५ ते २४ नोव्हेंबरपर्यंत राबविली जाणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने नौकाभ्रमणचा अनुभव तसेच जनजागृतीच्या दृष्टीने प्लास्टिकची समस्या दूर करण्यासाठी पथनाट्य यांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १५ नोव्हेंबरला या मोहिमेचा भगवती जेटी येथून प्रारंभ होणार असून, पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दि. १५ नोव्हेंबर रत्नागिरी ते रनपार जेटी, दि. १६ रोजी रनपार ते पूर्णगड, दि. १७ रोजी पूर्णगड ते आंबोळगड, दि. १८ रोजी आंबोळगड ते विजयदुर्ग जेटी, दि. १९ रोजी विजयदुर्ग ते देवगड जेटी, दि. २० रोजी देवगड ते विजयदुर्ग जेटी, दि. २१ रोजी विजयदुर्ग ते मुसाकाजी जेटी, दि. २२ रोजी विजयदुर्ग ते पूर्णगड, २३ रोजी पूर्णगड ते रनपार जेटी आणि २४ रोजी रनपार जेटी ते रत्नागिरी भगवती जेटी असा हा २३५ किमीचा कोकणशौर्य सागरी मार्ग राहणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेला कमांडिंग ऑफिसर अंकित रवी हेदेखील उपस्थित होते.

पथनाट्यातून जागृती
या नौकाभ्रमण मोहिमेसाठी २ अध्यापकीय एनसीसी अधिकारी, ३ नौका, सुरक्षा बोट, मदत नौका भारतीय हवामान खाते, कोस्टगार्डचे सहकार्य, नेव्ही या सर्वांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाण्याशी झुंज देत लाटांचा सामना करण्याचा अनुभव विद्यार्थी घेणार आहेत. ज्या बंदरात विद्यार्थी उतरतील त्या बंदरानजीकच्या लोकवस्तीमध्ये पथनाट्यातून जनजागृती करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 03/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here