World Cup 2023, Points Table : भारत गुणतालिकेत पुन्हा अव्वल, पाहा इतर संघाची स्थिती

0

वानखेडे मैदानात भारताने लंकेला अवघ्या 55 धावांत गुंडाळत थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. यंदाच्या विश्वचषकातील भारताचा हा सलग सातवा विजय होय.

भारताने या विजयासह गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान काबिज केले. गुरुवारी भारताकडून मोहम्मद शामीने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. भारताने वानखेडेच्या मैदानावर लंकादहन करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनमध्ये पोहचणारा भारत पहिला संघ ठरलाय.

गुणतालिकेत नेमका काय बदल झाला ?
भारताने श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव करत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. भारतीय संघ पहिल्या स्थानावर गेल्यामुळे आफ्रिका संघ दुसऱ्या स्थानावर घसरलाय. भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये पाच नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे सामना होणार आहे. भारतीय संघाने सात सामन्यात सात विजय मिळवत 14 गुणांची कमाई केली. तर आफ्रिका संघ सात सामन्यात सहा विजयासह 12 गुण घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. बुधवारी दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर घसरला . तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहचलाय. न्यूझीलंडचे सात सामन्यात तीन पराभव आणि चार विजय झालेत. 8 गुणांसह ते चौथ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडच्या पराभवाचा फायदा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या संघांना झालाय. या संघाचे सेमीफायनलमध्ये पोहचण्यचे चान्सेस आणखी वाढले आहेत.

इतर संघाची स्थिती काय ?
बाबारच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. सहा गुणांसह पाकिस्तानच्या विश्वचषकातील आशा जिवंत आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघाचे समान गुण आहेत, पण सरस रनरेटमुळे पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानी आहे. श्रीलंका संघ सातव्या स्थानावर आहे. श्रीलंका संघाचे सात सामन्यात पाच पराभव झालेत. नेदरलँडचा संघ चार गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. बांगलादेश निगेटिव्ह -1.446 च्या नेट रनरेटसह 2 गुण मिळवत नवव्या, इंग्लंड निगेटिव्ह -1.652 च्या खराब नेट रनरेटसह 2 गुण मिळवत दहाव्या क्रमांकावर आहे. शाकीबच्या नेतृत्वातील बांगलादेश संघाने विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. बांगलादेश संघाला सात सामन्यात फक्त दोन गुण मिळवता आलेत. बांगलादेशचा संघ फक्त अफगाणिस्तान संघाचा पराभव करु शकला. बांगलादेशला सलग सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. बांगलादेशचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघाचे विश्वचषकाचे आव्हान संपुष्टात आलेय

भारताचा 302 धावांनी विजय, श्रीलंकेचा डाव अवघ्या 55 धावांत संपुष्टात –
रोहित शर्माच्या भारतीय संघानं श्रीलंकेचा 302 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत सलग सातवा विजय साजरा केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेला विजयासाठी ३५८ धावांचं डोंगराएवढं मोठं आव्हान दिलं होतं. पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवघ्या धावांत दाणादाण उडाली. भारताच्या जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या वेगवान त्रिकूटानं श्रीलंकेचा डाव धावांत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याआधी, भारताच्या शुभमन गिलचं शतक आठ धावांनी हुकलं. सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधण्याचं विराट कोहलीचं स्वप्नही 12 धावांनी भंगलं. पण त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 189 धावांच्या भागिदारीच्या जोरावर भारतानं 50 षटकांत आठ बाद 357 धावांची मजल मारली. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने श्रीलंकेला अजिबात संघर्ष करण्याची संधी दिली नाही. 358 धावांचा बचाव करताना पहिल्या चेंडूपासूनच लंकेवर वर्चस्व गाजवले. जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर लंकेला धक्का दिला. त्यानंतर सिराज आणि शामी यांनी सावरायची संधीच दिली नाही. भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या 55 धावांवर गुंडाळत 302 धावांनी विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 03-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here