खासगी विमानाने ठाकरे कुटुंब डेहराडूनला रवाना, नितेश राणेंचा दावा; म्हणाले, लवकरच बेबी पेंग्विनला अटक होणार

0

मुंबई : ठाकरे कुटुंब काल दुपारी 1 वाजता डेहराडूनला रवाना झाला, असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) यांनी ट्वीटद्वारे केला आहे. भाजपच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) छत्तीसगडच्या दौऱ्यावर असल्याने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) टीका केली होती.

त्यावर जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही? हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी? असा सवाल राणेंनी विचारला आहे.

मराठा आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस पक्षाच्या प्रचारासाठी छत्तीसगढ दौऱ्यावर असताना टीका केली होती त्यावरून नितेश राणेंनी निशाणा साधला आहे. ठाकरे कुटुंब काल दुपारी 1 वाजता डेहराडूनला रवाना झाले आहे. हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी? जरांगे पाटील यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही, असा सवाल नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना केला. देवेंद्र फडणवीस पक्षाच्या कामासाठी गेले होते, कौटुंबिक सहलीसाठी गेले नव्हते असे म्हणत नितेश राणेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

बेबी पेंग्विनला लवकरच अटक होणार

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना काही दिवसांत अटक होणार आहे. यामुळे उद्धव ठाकरे बिथरले आहेत, असा मोठा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. आज पुन्हा नितेश राणेंनी आदित्य ठाकरेचे नाव न घेता डिवचले आहे. नितेश राणे म्हणाले, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात लवकरच बेबी पेंग्विनला प्रकरणात अटकेची शक्यता आहे.

जवळपास तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. त्याच्या काही दिवस आधीच दिशा सालियाने हीने देखील आत्महत्या केली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी सातत्याने या दोन्ही आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले होते. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे. , दसरा मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे देश सोडून जाणार आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान आत्महत्या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी आदित्य हे पाऊल उचलणार आहेत असेही राणे म्हटले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 03-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here