मुंबई : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांना पत्र लिहिले आहे. खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
परिशिष्ट दहा नुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्राच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्षांना विनंती केली आहे.

चार महिने उलटून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी पत्राच्या माध्यमातून खंत व्यक्त केली. कारवाई होत नसल्याने परिशिष्ट दहाचे उल्लंघन होत असल्याची बाब सुप्रिया सुळेंकडून नमूद करण्यात आली आहे.
जुलै महिन्यात केली होती याचिका
खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी आम्ही 4 जुलैला याचिका दाखल केली होती. मात्र, आजपर्यंत त्यावर कुठलीही करावी केली गेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 03-11-2023