साडवली : देवरूख सावरकर चौक येथे झालेल्या मारहाण प्रकरणी तिघांवर देवरूख पोलीस ठाण्यात बुधवारी (ता. १) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सुरेश चव्हाण (रा. देवरूख मधली आळी), मनोज उर्फ मॅक मोहन चव्हाण ( रा. देवरूख) व राजन पद्माकर डोंगरे (रा. भुवड कॉलनी देवरूख) अशी संशयिताचे नावे आहेत. देवरूख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश शिवाजी मोहिते (वय ३२ वर्षे, रा. सह्याद्रीनगर साडवली) असे तक्रार देणाऱ्याचे नाव आहे.
रमेश मोहिते व त्याचे मित्र हे सावरकर चौक येथील हॉटेल मध्ये जेवण करीत होते. याठिकाणी जेवणासाठी आलेल्या सागर चव्हाण, मनोज चव्हाण व राजन डोगरे यांच्यामध्ये. बाचाबाची सुरू होती. यावेळी रमेश मोहिते याने तुम्ही आपआपसात का भांडत आहात असे त्यांना विचारले. याचा राग मनात धरून त्या तिघांनी रमेश मोहिते यांना मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 03/Nov/2023
