राजापूर : राजापूर तालुक्यातील ओशिवळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जिल्हा परिषदमधून दोन वेगवेगळी विकास कामे करण्यात आली. त्यातील नारकर वाडी येथील साकवाचे काम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे झालेलं आहे. पुर्ण साकव हा फक्त ६ महिन्यात ढासळून अवस्था अतिशय बिकट आहे. साकवाचे काम हे लाकडी फळ्या, सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या टाकून काँक्रिट करण्यात आले आहे. तसेच बौध्दवाडी रस्त्याची सुध्दा स्थिती अतिशय बिकट आहे. सदर रस्त्याच्या अंदाजपत्रकामध्ये ५ मीटरची मोरी असुन रस्ता मध्ये कुठेही मोरी टाकलेली दिसत नाही. मात्र सदर मोरीचे कामासंबंधी अधिकान्यांचीही चौकशी करण्यात यावी. अशा प्रकारचे सखोल चौकशीची मागणी करणारे निवेदन मनसेने दिले आहे.
या दोन्ही कामाची सखोल चौकशी करुन संबंधीत ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडून करण्यात आली आहे. तसे पत्र गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. या वेळी विभाग संघटक श्री प्रशांत (दादा) चव्हाण, उपतालुका अध्यक्ष श्री प्रदिप कणेरे, विभाग अध्यक्ष श्री शंकर पटकारे आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 03/Nov/2023
