संपर्क युनिक फाउंडेशनच्या डॉ. दिशा चव्हाण आयुष ग्लोबल अवार्डने सम्मानित

0

रत्नागिरी : दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी श्री साईबाबा यांच्या नगरीत शिर्डी पुष्पक रिसोर्टमध्ये आयुष ग्लोबल अवार्ड कार्यक्रम आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन (AIMA ) & आयुष ग्लोबल मेडिकल एसोसिएशन (AGMA), तथा विस्तार केंद्र- राजकोट, एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा. एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

आयुष चिकित्सा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्यकरण्याबाबत डॉ. दिशा अरुण चव्हाण यांना आयुष ग्लोबल अवार्ड 2023 या मानाच्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. डॉ दिशा चव्हाण ह्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी च्या महिला संघटक आहेत. या कार्यक्रमात एमएसएमई राजकोट सेंटर द्वारा लिनसिक्स सिग्मा वर आधारित आयुष हॉस्पिटल वर्ल्ड क्लास पेशेंट केयर या विषयावर कार्यक्रम चे मुख्य अतिथि डॉ प्रवीण जोशी द्वारा सम्बोधित करण्यात आले.

सदर कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून फिल्म स्टार देवदत्त नागे, डॉ प्रवीण जोशी, उप संचालक तथा विशेष अतिथी श्री प्रणव पांड्या, प्रशिक्षण अधिकारी एमएसएमई टी डी सी (पीपीडीसी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार तथा फिल्म स्टार एवं टीवी एक्टर मिस ऋतुजा बागवे, फिल्म स्टार सुयोग गोन्हे, आणि कलर टीवी मराठी एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर शांतनु बोरकर, डॉ सतीश कराळे, चेअरमन एआय एम. ए. डॉ नितीनराजे पाटील व्हाईस चेअरमन एआयएमए आणि समस्त टीम ए. आय. एम. ए. आदी मान्यवरच्या उपस्थितीमध्ये सदर अवॉर्ड देण्यात आले. हे अवॉर्ड मिळाल्याबद्दल डॉ. दिशा अरुण चव्हाण यांचे संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे परिवारातर्फे तसेच सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 03/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here