चिपळूण : सोमवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी महिला मंडळ वडनाका चिपळूण येथे लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी, जिजाऊ ब्रिगेड सावर्डे चिपळूण, प्रयास फाऊंडेशन, हेल्प फऊंडेशन यांच्या वतीने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर व समस्यावर शिबिर घेण्यात आले.
यामध्ये सांधेदुखी, पाठदुखी, पाठीचा कणा, कंबरदुखी यासाठी कशी काळजी घ्यायची, रोज कोणते व्यायाम करावेत तसेच दैनंदिन आयुष्यात नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी वालावलकर हॉस्पिटल डेरवणच्या फिजिओथेरपिस्ट डॉ. देविका शहा, डॉ. सत्यज्ञा आणि डॉ. आसावरी यांनी मार्गदर्शनातून प्रात्यक्षिक दाखविले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुमती जांभेकर, संपदा भोसले व डॉ. देविका उपस्थिती होत्या.
यावेळी लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीच्या अध्यक्ष अंजली कदम, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अनुजा भोसले, प्रयास फाऊंडेशनच्या अध्यक्ष रविना गुजर, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष स्नेहल चव्हाण, तालुकाध्यक्ष मीनल गुर, शहर अध्यक्ष वर्षा खटके, निर्मला जाधव, ऋतुजा देवळेकर, माया गुहागरकर, संचिता राजेशिर्के आदींची उपस्थिती होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 03/Nov/2023
