चिपळूण : कोसळलेला पूल, लाँचर्स लोंबकळतच

0

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुलाचा भाग आणि त्यावरील लाँचर्स अद्यापही लोबकळतच आहेत. कोसळलेला पुलाचा भाग काढण्याबाबत आता डिझाईन तयार करण्याचे काम सुरू आहे. या डिझाईनला मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील काम सुरू केले जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय तज्ज समितीचा चौकशी अहवालही अद्याप राष्ट्रीय महामार्ग विभागास प्राप्त झालेला नाही. दडाणपुलाच्या सर्वच कामाला विलंब लागण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, दुर्घटनाग्रस्त उड्डाणपुलाचा कोसळलेला भाग अजूनही जागेवर तसा पडून आहे. त्यावरील अजस्त्र लांचर यंत्रणाही तशा लोंबकळत आहे. दुर्घटनाग्रस्त पुलाच्या दोन्ही बाजूने असलेल्या सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू असल्याने पुलाचे चित्र भीतीदायक आहे. याबाबत महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोसळलेला पूल, त्यावरील लाँचरसह यंत्रणा ही मोठ्या वजनी आहेत. शिवाय त्यामध्ये टाकलेल्या केबल्सही व्यवस्थित हाताळणे आवश्यक आहे. त्यामुळे पुलाचा कोसळलेला भाग आणि लाँचर यंत्रणा कशी काढायची याबाबतचे डिझाईन तयार केले जात आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर ते काम हाती घेतले जाणार आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून शहरातून जात असलेल्या उड्डाणपुलाचे काम सुरू असताना १५ दिवसांपूर्वी त्यातील काही भाग लाँचरसह मधोमध कोसळला. यामुळे महामार्गावरील एकूणच कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जाऊ लागली. दरम्यान, उड्डाणपूल दुर्घटनेनंतर त्यांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तज्ज्ञ समिती जाहीर केली होती. त्यानुसार या समितीतील टंडन कन्सल्टन मनोष गुप्ता, हेगडे कन्सल्टन्सी सुब्रमण्य हेगडे यांच्या समितीने दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी करताना पुलाचे बांधकाम करणाऱ्यांमधील कंत्राटदार, निरीक्षण करणाऱ्या कंपन्यांचे अभियंते, अधिकारी यांचे जवाब घेतले.

प्राथमिक अहवालही नाही
कोंडमळा येथे गर्डर बनवले जातात, त्या कास्टिंग प्लान्टमध्ये जाऊन तेथील साहित्याचीही पाहणी करताना तेथील संबंधितांचे जाबजवाव घेत चौकशी केली. आठवडाभरात या समितीकडून प्राथमिक अहवाल महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंत्यांना प्राप्त होणार होता; मात्र तो अजूनही प्राप्त झालेला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:27 PM 03/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here