मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी ९ दिवसांनंतर आपलं आमरण उपोषण सोडलं आहे. सर्वपक्षीय विनंतीनंतर त्यांना हा निर्णय घेतला. मात्र उपोषणानंतर आता मनोज जरांगे यांची प्रकृती आणखी खालावली आहे.
जरांगे यांची दिवाळी रुग्णालयातच जाणार असल्याचा अंदाज आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली आहे. मागच्या वेळी त्यांनी उपोषण केलं होतं त्यापेक्षाही सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. यावेळी त्यांना अधिक त्रास झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे मनोज जरांगे पाटील यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे.
अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांची दिवाळी रुग्णालयाच होईल असं दिसतंय. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वेळेच्या तुलनेत त्यांना यावेळी जास्त अशक्तपणा आहे. तसेच वजन देखील जास्त घटलं आहे. लिव्हर आणि किडनीचे पॅरामीटर देखील डिरेंज झाले आहेत. ब्लड प्रेशरही कमी आहे. या दृष्टीने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
तारखेचा घोळ नाही
सरकारने मागितलेली वेळ आणि मनोज जरांगे यांनी दिलेली डेडलाईन यात घोळ असल्याची चर्चा रंगली होती. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, तारखेचा कोणताही घोळ नाही, 24 डिसेंबरच आहे. मी सरसकट मागणी केली होती, त्याच मुद्द्यावर चर्चा झाली असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:43 PM 03/Nov/2023
