रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीत स्फोट

0

रायगड : जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास गॅसगळती होऊन स्फोट झाल्याचं वृत्त आहे. स्फोटानंतर कंपनीत आग लागली असून आगीत एकूण ११ कामगार अडकले आहेत.

ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत हा स्फोट झाला असून गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याचं प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. कंपनीतून आगीचे आणि धुराचे लोट उसळत आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

कंपनीत एकूण ५७ कामगार होते अशी माहिती आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याबरोबरच कामगारांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 03-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here