मुंबई : शहरातील श्री गणेश आखाड्याच्या पैलवानांनी विविध निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. आखाड्याच्या ११ पैलवानांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, पालघर जिल्ह्यातील विरार व रत्नागिरी याठिकाणी निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या. त्यात श्री गणेश आखाड्याच्या पैलवान ओम जाधव (८० किलो), विशाल माटेकर (९२ किलो), सूरज माने, परवेश यादव (दोघेही ७९ किलो), लोरीक यादव, अतुल घराते (दोघेही ६५ किलो), चिराग पाटील (९७ किलो), सूर्यकांत देसाई (८६ किलो), गणेश शिंदे (७० किलो), सूरज माने (८६ किलो – मॅट विभाग), विशाल माटेकर (९२ किलो- मॅट विभाग) या पैलवानांनी पहिला क्रमांक पटकावीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.
भाईंदर पश्चिम येथे मिरा-भाईंदर महापालिकेच्या सहकार्याने श्री गणेश आखाडा चालवण्यात येतो. या आखाड्यात सराव करणाऱ्या मल्लांनी राज्य, तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षिसे मिळवली आहेत. या आखाड्याच्या तब्बल ११ पैलवानांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. याव्यतिरिक्त आखाड्याच्या चार पैलवानांनीही द्वितीय क्रमांक पटकावला. त्यामुळे निवड चाचणी स्पर्धेत ११ सुवर्णपदक, चार रौप्यपदक अशी एकूण १५ पदकांची लयलूट केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:02 PM 03/Nov/2023
