रत्नागिरी : भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आणि हातिस ग्रामविकास मंडळातर्फे हातीस येथे मधुमक्षिका पालन कृषिपूरक उद्योग या विषयावर प्रशिक्षण शिबिर झाले. त्याला परिसरातील तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभला.
माजी कृषीविद्यावेत्ता डॉ. दिलीप नागवेकर यांनी स्थानिक पीक परिस्थिती आणि त्यामध्ये झालेले बदल याबद्दल माहिती दिली. नवीन उपक्रमांकडे शेतकऱ्यांनी वळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तांत्रिक सत्रामध्ये कृषिविद्यावेत्ता डॉ. किरण मालशे यांनी मधुमक्षिका पालन आणि त्यांचे सर्व बाजूंनी महत्त्व विशद केले. कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी मधुमक्षिका पालन कसे करावे, त्यांच्या प्रजाती, हाताळणी, मध संकलन कसे करावे, याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थित तरुणांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
यावेळी हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर, माजी अध्यक्ष विजय नागवेकर, जयंत नागवेकर, विद्याधर नागवेकर, योगेश नागवेकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:08 03-11-2023
