रत्नागिरी : मारुती मंदिर येथे पाणी योजनेची पाईप लाईन फुटण्याचे सत्र सुरुच आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता या ठिकाणी पाईप लाईन पुन्हा फुटली. पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून वाया गेले. मारुती मंदिर येथे सतत पाईन फुटून रस्ता खोदाई करावी लागत असल्याने येथील रस्त्याची देखील दुरवस्था झाली आहे.
रनपच्या नव्या पाणी योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र दररोज योजनेचे नवे पाईप कुठे ना कुठे फुटून पाण्याची नासाडी होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. शहरातील मारुती मंदिर येथे पाइपलाइन फुटण्याच्या घटना वारंवार होत आहेत. नव्या पाणी योजेनेचे हायड्रॉलिक टेस्टिंग करण्यात आले यावेळी देखील अनेक ठिकाणी पाईप लाईन फुटली होती. मात्र, मारुती मंदिर येथे पाईप फुटण्याचे सत्रच सुरू आहे.
शुक्रवारी देखील दुपारी येथील पाईप लाईन पुन्हा फुटली. डांबरी रस्त्या खालून पाण्याचा झोतच बाहेर पडला आणि परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. हजारो लिटर पाणी अवघ्या काही मिनिटात वाया गेले. अचानक पाणी सर्वत्र झाल्याने फेरीवाल्यांची धावपळ उडाली. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गळती लागलेल्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करत गळती लागलेली पाईप लाईन दुरुस्त करत पाण्याची नासाडी रोखली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:25 03-11-2023
