महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे तिसरे नर्सिंग कॉलेज रत्नागिरी येथे सुरु

0

रत्नागिरी : शिरगाव (रत्नागिरी) येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे तिसरे नवीन नर्सिंग कॉलेज शैक्षणिक या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे. यासाठी प्रवेशाची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर असल्याची माहिती प्रकल्पाचे प्रमुख मंदार सावंतदेसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

आधुनिक विचारांप्रमाणे परिचर्या सेवा फक्त रुग्णालयापुरत्या मर्यादित न राहता सर्व समाजापर्यंत पोहोचून आरोग्य विषयक माहिती पुरवण्याचे काम परिचर्या करतात. या हेतूनेच संस्थेची पुणे व नागपूर येथे २ नर्सिंग महाविद्यालये आहेत. यामधून ANM, GNM, BSC, PBBSC, MSC, PhD नर्सिंग हे अभ्यासक्रम शिकवले जातात.

रत्नागिरीत सुरु होणारे संस्थेचे तिसरे महाविद्यालय असणार आहे. यामध्ये ए. एन. एम. नर्सिंग हा दोन वर्षाचा शासनमान्य डिप्लोमा कोर्स सुरु होणार आहेत. ह्या नर्सिंग कॉलेजला महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेची मान्यता प्राप्त आहे. नर्सिंग कॉलेजची स्वतंत्र इमारत व स्वतंत्र वसतिगृहाची सोय आहे. तसेच प्रशस्त वर्गखोल्या व अत्याधुनिक प्रात्यक्षिक वर्ग आहेत, जिथे विद्यार्थिनी नर्सिंग प्रात्यक्षिकांचा सराव करू शकतात. विद्यार्थिनींना वाहतूकीची सुविधा आहे. या नर्सिंग कॉलेजमध्ये 400 नर्सिंगच्या पुस्तकांचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. या कोर्ससाठी विद्यार्थिनींना 10+2 कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कॉलेजमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक अनुभवासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी, चिंतामणी हॉस्पिटल रत्नागिरी, चिरायू हॉस्पिटल रत्नागिरी, तसेच शहर व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात येणार आहे. यासाठी वाहतूकीची सोय कॉलेजने केली आहे.

या कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरु असून प्रवेशासाठी २८ नोव्हेंबर हि शेवटची तारीख आहे. मर्यादित जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी कॉलेज ऑफ शिरगाव, साखरतर रोड, रत्नागिरी. प्रवेशासाठी ७६६६५०४२४३ / ९४०३२१४११९ या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 04-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here