खेड : येथील तीन जणांनी एकाला बँकेत गहाण ठेवलेली जमीन लाखो रुपयांना विकली असल्याची बाब उघड झाली असून तिघांविरोधात खेड पोलीस ठाण्यात दि. २ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. १० जुलै २०१७ ते १३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत शहरातील गुलमोहर पार्क परिसरात घडला आहे.
या संदर्भातील माहितीनुसार दि. १० जुलै २०१७ ते १३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत शहरातील गुलमोहर पार्क परिसरात तालुक्यातील कर्जी येथील एकजण, म. हनिफ हमजा मुल्ला (रा. निळीक ता. खेड) व जावेद युसुफ परकार (रा. गुलमोहर पार्क, खेड) यांनी मिळकत क्रमांक २७७ /१/अ/ ९ मधील क्षेत्र ०४ ६० चे या मिळकतीचे कागदपत्र बँक ऑफ महाराष्ट्र खेड येथून कर्ज काढून गहाण ठेवलेली असताना सदर मिळकर निर्वेध असल्याचे भासवून एका व्यक्तीला २९ लाख रूपयास विकून विश्वासघात केला व त्याची एकूण ३० लाख ८४ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिघा संशयितांविरुदध दि. २ रोजी गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 04/Nov/2023
