रत्नागिरी : मंगळवारी शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर बुधवारीही रत्नागिरीत मळभी वातावरणात पावसाला पोषकता निर्माण झाली होती. मात्र, दुपारी १२ नंतर उन्हाचा ताप वाढून तापमानात किंचित वाढ झाली. नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा विना थंडाचा जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
नोव्हेंबर महिन्यात एल निनोची स्थिती कायम राहणार असल्याने कोकण किनारपट्टी भागात दिवाळीच्या पूर्वाधात शीतलहरी सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मळभाची स्थिती होती. त्यामुळे आगामी काळात रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. बुधवारी पुन्हा तापमानात किंचित वाढ झाली.
रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी सकाळी दहा वाजता २९ अंश सेल्सियस तामानाची नोंद झाली. दुपारी यामध्ये १ अंशाची भर पडली. मात्र, किनारी भागात वाढत्या उन्हाने तापमान वाढू लागल्याने पुढील किमान दहा दिवस थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 04-11-2023
