राष्ट्रवादीच्या खेड तालुकाध्यक्षांचा राजीनामा

0

खेड : येथील राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष (अजित पवार गट) स. तु. कदम यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे खेडच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

स. तु. कदम हे त्या वेळचे शरद पवार यांचे खंदे समर्थक. तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या धामणी गावचे सरपंचपद त्यांनी १९८३ पासून सलग १५ वर्षे भूषवले आहे. शरद पवार यांच्याच नेतृत्व व आशीर्वादाने त्यांनी आपल्या गावचा विकास केलेला आहे. एवढेच नव्हे, तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष झाल्यानंतरही तालुक्याच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी आजपर्यंत केलेल्या विकासकामात कोणतीही अपेक्षा केली नाही. सध्याच्या गलिच्छ वातावरणात सर्वच पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीही याला अपवाद नाही.

आपण सरपंचपदापासून कार्यरत असताना आतापर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही मानपान मिळत होता; पण तो आता दुर्लभ झाला असल्याचे आपणाला जाणवत आहे. त्यामुळे आपल्याला मानणारे व आपणाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज होऊ नये, अशी आपली इच्छा आहे तसेच सध्या आपली प्रकृतीही ठीक नसते. त्यामुळे पक्षाच्या कामामध्ये म्हणावा तसा वेळ देऊ शकत नाही. आपण यापुढे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून राहू; पण जबाबदारीचे पद नको असे कदम यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 04-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here