रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथे भरधाव बसने पाठीमागून एक कार आणि दोन दुचाकिंना धडक देत अपघात केला.अपघाताची ही घटना गुरुवार 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वा.घडली होती.
याप्रकरणी बस चालक दिपक अंबादास पांचाळ (40, रा.चिपळूण) याच्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात कार चालकाने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी ते आपल्या ताब्यातील बलेनो कार (एमएच-08-एजी-3560) घेउन हाखंबा ते रत्नागिरी असे येत होते. त्यांनी आपली कार हातखंबा पिकअप शेडच्या पुढील बाजुला उभी केली होती. त्याच सुमारास दिपक पांचाळ आपल्या ताब्यातील बस (एमएच-47-ई-8199) भरधाव वेगाने घेउन पाठीमागून येत असताना त्याने पांचाळ यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे पांचाळ यांची कार पुढे उभ्या असलेल्या अन्य दोन दुचाकींवर आदळल्याने एकूण तीन वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी बस चालकाविरोधात भादंवि कायदा कलम 279, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 04-11-2023
