रत्नागिरी : शिक्षक पतपेढी निवडणुकीसाठी ‘महायुती’ चा जाहीरनामा

0

रत्नागिरी : प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक मंडळ निवडणुकीसाठी ४ नोव्हेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. तत्पूर्वी महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करून पतपेढीचे सत्ताधारी म्हणून मतदानाच्या वेळी जबाबदारीने निर्णय घेण्याचे आवाहन महायुतीमार्फत करण्यात आले आहे. महायुती सर्वच्या सर्व १६ उमेदवाराना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पतपेढीची कर्जमर्यादा ५० लाख रुपये करण्यात आली असून परतफेडीचा कालावधी १५ वर्षांवरून २० वर्षे करण्यात आला आहे. जामीन तारण कर्जमर्यादा १० लाख रुपये करण्यात आली आहे. सण अग्रीम मर्यादा १५ हजार रुपये करण्यात आली आहे.

सहकारातील काही बंधनांमुळे व्याजदर फक्त एक टक्का ठेवण्यात आला आहे. समासदांना त्यांच्या मासिक बचत खात्यातून ९० टक्के रक्कम बिनव्याजी परतफेडीच्या अटीवर टाळता येणार आहे. रेव्हेन्यू स्टॅम्प न घेता पतपेढीने तो बोजा स्वतः स्वीकारला आहे.

सभासद कुटुंब सहाय्यता निधीद्वारे देण्यात येणारे आर्थिक सहाय्य ३ लाख रुपयांवरून ७ लाख रुपये करण्यात आली आहेत तर निवृत्तधन योजना सुरू झाली आहे. पतपेढीकडून कोअर बँकिंग प्रणाली सुरू झाली आहे. ५० हजार रुपये आकस्मिक कर्जप्रदान करण्याची सुविधा पतपेढीने उपलब्ध करून दिली आहे. पतपेढीकडून मुदतठेवीवर ८.७५ टक्के व्याज दिले जात असून कर्जावरील व्याजदर ९.५० टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. वर्गणी उचल मर्यादा पाच लाख रुपये ठेवण्यात आली आहे. महायुती पॅनलमार्फत सभासदांच्या हिताचे अशा प्रकारचे ३३ निर्णय घेण्यात आले आहे.

सभासद व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य विमा आधारित आरोग्य आधार योजना तयार करण्यात येणार आहे. शिक्षक सभासदांच्या सध्याच्या तणायुक्त परिस्थितीवर मात करण्यासाठी दरवर्षी पतपेढीमार्फत सभासदांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. गरजेनुसार कर्जमर्यादा वाढवली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 04/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here