मुंबई : 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती.
विश्वचषकात (World Cup 2023) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्या सामन्यातही पांड्यानं केवळ तीनच चेंडू टाकले होते. यानंतर टीम इंडियानं मागील तीन सामने त्याच्याशिवाय खेळले आहेत. हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता. तेव्हापासूनच चाहते हार्दिकच्या पुनरागमनाकडे डोळे लावून बसले होते. मात्र, आता चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं आहे.
ऑलराउंडर हार्दिक पांड्या विश्वचषकातील उर्वरित सामने खेळणार नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या विश्वचषक 2023 मधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होता. पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा (Prasidh Krishna) संघात समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियानं सेमीफायनल्समध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. यामध्ये ऑलराउंडर पांड्याचा सिंहाचा वाटा आहे. अशातच दुखापतीमुळे संघातून बाहेर गेलेला पांड्या सेमीफायनलपर्यंत संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुखापतीमुळे हार्दिक पांड्या विश्वचषकाचे उर्वरित सामने खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान दुखापत
पांड्या उपांत्य फेरीतून बाहेर पडणं हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. अनुभवी अष्टपैलू असलेला हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी किती महत्त्वाचा आहे, हे केवळ देशानंच नाही तर संपूर्ण जगानं पाहिलं आहे. हार्दिक पांड्यानं अनेक मोठ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात पुण्यात झालेल्या सामन्यादरम्यान पांड्याला दुखापत झाली होती.
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात पुण्यात खेळलेल्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली होती. त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झालेली. याच कारणामुळे न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना पांड्या खेळू शकलेला नाही. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान मिळालं आहे.
गेल्या सामन्यात श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी धुव्वा उडवल्यानंतर टीम इंडियानं सेमीफायनल्समध्ये दणक्यात प्रवेश केला. सध्या टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत टीम इंडियानं 7 सामने खेळले आहेत आणि सर्वच्यासर्व सामने जिंकले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र उपांत्य फेरीपूर्वी पांड्याचं संघाबाहेर पडणं खूपच धक्कादायक आहे. हार्दिक पांड्यासारख्या अनुभवी आणि अष्टपैलू खेळाडूशिवाय टीम इंडिया सेमीफायनल्सचं शिवधनुष्य कसं पेलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, हार्दिक पंड्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. प्रसिद्ध कृष्णाने भारतासाठी आतापर्यंत १७ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने २९ बळी घेतले आहेत. 12 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. परंतू दुखापतीनंतर त्याच्या जागी आलेल्या सिराजने संघात आपले स्थान पक्के केले आहे. यामुळे त्याला संधी मिळाली नव्हती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 04-11-2023