मनसेच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

वरवेली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालक्याच्या वतीने, वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या सहकार्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर पार पडले. याला चांगला प्रतिसाद लाभला. ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. मनसे राज्य सरचिटणीस तथा खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली व गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, माजी तालुका अध्यक्ष राजेश शेटे, गणेश कदम, गिरीश चव्हाण यांच्या नियोजनाखाली शृंगारतळी येथील संत तुकाराम हॉल येथे शिबिर पार पडले. यावेळी संतोष नलावडे, गणेश भोंदे, सुनील हळदणकर, नाना चाळके, मुबिन गोठे, सुबोध सावंत, आकलेश जाधव, डॉ. राजेंद्र पवार, पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:34 PM 01-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here