ब्रेकिंग: मुंबईत १५ जुलैपर्यंत संचारबंदी

मुंबई : राज्य सरकारनं मिशन बिगीन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये मोठी सुट दिली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात, तसंच प्रामुख्यानं मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून १५ जुलैपर्यंत मुंबईत १४४ कलम अंतर्गत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय मुंबईचे पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी घेतला आहे. या निर्णयामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. दरम्यान, ५ ते रात्री ९ या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:05 PM 01-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here