बँकेतून बोलतोय असे सांगत वृद्ध महिलेला घातला ७६ हजारांचा गंडा

रत्नागिरी : शहराजवळील नेवरे गावातील ६१ वर्षीय महिला उषा अभय खेर यांना एका शर्मा नामक अज्ञात इसमाने बँकेतून बोलतोय असे सांगत ७६,१५८ रुपयांचा गंडा घातला. या भामट्याने महिलेच्या मोबाईल वर मेसेज व फोन करून बचत खात्याची माहिती घेऊन तुमच्या खात्याची के. वाय. सी. करणे गरजेचे असून ते न केल्यास खाते बंद होईल असे सांगत लिंक पाठवून खात्यातील ७६,१८५ रुपयांची रक्कम ऑनलाईन काढून फसवणूक केली आहे. ३० जून रोजी दुपारी १ च्या सुमारास हि घटना घडली असून याबाबत महिलेने ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी या घटनेची तत्काळ दखल घेत या महिलेची भेट घेतली आहे व तपास सुरु केला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
04:56 PM 01/Jul/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here