रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम रत्नागिरी उपविभाग क्र. १ मधील मुख्यालय अभियंता पदाचा कार्यभार शाखा अभियंता सुधीर कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. विद्यमान अभियंता जनक धोत्रेकर यांची ठाणे जिल्ह्यातील जव्हार शाखेत बदली झाली आहे. अधीक्षक अभियंता, उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रत्नागिरी उपविभागीय अभियंत्यांनी कार्यमुक्तीचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी सुधीर कांबळे यांच्याकडे या पदाचा कार्यभार देण्यात आला. रत्नागिरी उपविभाग क्रमांक एक मधील मुख्यालय विभाग येथे जनक धोत्रेकर यांनी यशस्वीरित्या काम केले होते. मोठमोठ्या कामांची जबाबदारी स्विकारून ती त्यांनी यशस्वी केली होती. शासनाने दि.२९ जुलैला जनक धोत्रेकर यांची जव्हार येथे बदलीचे आदेश काढले. राज्य सरकारने बदलीचे आदेश दिल्यानंतर अधीक्षक अभियंता श्री. कुलकर्णी, उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता जोगदंड, उपविभागीय अभियंता श्री.साळवी यांनी श्री.धोत्रेकर यांना कार्यमुक्त करून या पदाचा पदभार सुधीर कांबळे यांच्याकडे देण्याचे आदेश काढण्यात आले. परंतु श्री. धोत्रेकर यांनी कार्यमुक्तीचे आदेश स्विकारले नसल्याने त्यांना टपालाने पाठविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात श्री. धोत्रेकर यांनी पदभार न सोडल्याने श्री.कांबळे यांना पदभार स्विकारणे अवघड झाले आहेत.
