खरिपासाठी ९१०५ मे.टन खताची उपलब्धता

रत्नागिरी : खरीप हंगामात शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन गरजेनुसार खत उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच खते आणि बियाणांचा काळाबाजार होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग कार्यरत आहे. जिल्ह्यात सध्या ९१०५.५५ मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले, की सेंद्रीय शेतीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. मात्र रासायनिक खतांचा वापर करून शेती करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर कंपनीतर्फे लिंबोळी युक्त युरिया ५११६.६५ मेट्रीक टन आणि १५:१५:१५ खत १५८१ मेट्रीक टन इतका पुरवठा आतापर्यंत झाला आहे. ही राष्ट्रीयकृत कंपनी सर्वाधिक प्रमाणात खतांचा पुरवठा करते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 02-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here