खेड न.प. ने मदतीचा हात पुढे करत पूरग्रस्तांसाठी ११ लाखाची मदत

0

खेड : मुसळधार पावसाने अवघ्या कोकणासह सांगली, कोल्हापूरमध्ये झालेल्या जलप्रलयामुळे सर्वसामान्य नागरिक बेघर झाला असून पुराच्या तडाख्यात सापडलेले नागरिक अजूनही नीटसे सावरलेले नाहीत. प्रशासकीय तसेच विविध ठिकाणी मदत दाखल होत आहे. मात्र अजूनही मदतीची प्रतीक्षा पूरग्रस्तांना असताना येथील नगर परिषदेने मदतीचा हात पुढे करत पूरग्रस्तांसाठी ११ लाखाची मदत देण्याचा निर्णय शुक्रवारी पार पडलेल्या विशेष बैठकीत सर्वानुमते घेतला. येथील नगर परिषद सभागहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत सर्व नगरसेवक उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील असलेल्या मदत निधीच्या विषयावर चर्चा करण्यात येऊन या विषयाला सर्व नगरसेवक तसेच दोन्ही गट नेत्यांनी सकारात्मक चर्चा केल्याने पूरग्रस्तांसाठी तब्बल ११ लाख रुपयांचा निधी सढळ हाताने मदत करण्याचे सवार्नुमते ठराव करण्यात आला. तसेच देण्यात येणारा निधीसह येथील न.प चे सर्व नगरसेवक , नगर परिषद कर्मचारी स्वतः येथील साधन सामग्री घेऊन पूरग्रस्त भागात जावून स्वच्छता देखील करणार असल्याचा ठराव संमत करण्यात आला. असा निर्णय घेऊन आपदग्रस्तांना स्वतः मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेणारी जिल्ह्यातील खेड नगरपरिषद एकमेव नगर परिषद ठरली आहे. या निर्णयाबाबत नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सर्व नगरसेवकांचे विशेष अभिनदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here