‘ठिपक्यांची रांगोळी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

0

‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे.

टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या दहात होती. मालिकेतील अप्पू आणि शशांकची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 7 नोव्हेंबर 2023 रोजी या मालिकेचा शेवटचा सीन शूट झाला आहे. मालिकेत अप्पू आणि शशांकला गोड बाळ होणार आहे. त्यामुळे मालिकेचा गोड शेवट होणार आहे. एकीकडे मालिकेचा गोड शेवट होणार असल्याने आणि त्यातच मालिकेचा प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने मालिकाप्रेमी नाराज झाले आहेत.

प्रेक्षकांना खिळवून ठेणवारी ‘ठिपक्यांची रांगोळी’
‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेचा पहिला भाग 4 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसारित झाला होता. आता बरोबर दोन वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या ही पात्र आता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहेत. मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहत्यांना आता या सर्व पात्रांची नक्कीच आठवण येईल.

‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. मालिकेत सतत येणऱ्या रंजक ट्वीस्टमुळे नेहमीच ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या दहामध्ये राहिली आहे. पण आता ही मालिका ऑएएअर होणार आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित आहे. एकत्र कुटुंब असणं किती महत्त्वाचं असतं हे या मालिकेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आठवणीत राहील. जीवाला जीव देणारं मोठं कुटुंब असावं, मायेची उब देणाऱ्या टुमदार कानिटकर वाड्याप्रमाणे एक घर असावं अशी भावना ही मालिका पाहताना प्रत्येकाच्या मनात नक्कीच आली असेल. नाशकातल्या कानिटकर कुटुंबाची गोष्ट या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेबद्दल जाणून घ्या…
‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका एकत्र कुटुंबाची गोष्ट असली तरी एक गोड लव्हस्टोरी या मालिकेत दाखवण्यात आली आहे. दोन टोकाचे दोन व्यक्ती परिस्थितीमुळे कसे एकत्र येतात आणि मग कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात या सर्वांमध्ये त्यांच्या एकत्र कुटुंबाचा त्यांना कसा पाठिंबा मिळतो या सर्व गोष्टींची सांगड उत्तम पद्धतीने या मालिकेत दाखवण्यात आली. कानिटकर कुटुंबासाठी आयुष्य म्हणजे, सोहळा आहे आणि घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट म्हणजे एखादा सण समारंभ. अशा या हसत्या-खेळत्या कुटुंबाची गोष्ट प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.

कलाकारांची तगडी फौज असलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’
‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळाली आहे. सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांचं चांगल मनोरंजन केलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:22 09-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here