परटवणे येथील श्री सत्यसेवा मंडळातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

रत्नागिरी : शहरातील परटवणे येथील श्री सत्यसेवा मंडळ यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० हजार रुपयांची मदत देण्यात आली. त्याबाबतचा धनादेश मंडळाचे अध्यक्ष मधुकर गुरव, सरचिटणीस मोहन नाखरेकर यांच्या हस्ते बुधवारी उप निवासी जिल्हाधिकारी भडकमवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मंडळाचे खजिनदार अरविंद नागवेकर, सदस्य अजित शिंदे, प्रशांत पवार, रणजीत सावंत, रामदास पाटील आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:35 PM 02-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here