‘सरसकट लॉकडाऊन करण्यात यावे’

लांजा : जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या व्यावसायिकांना या बंदी काळात ठराविक दिवसांचे, टप्याटप्याने आणि वेळेचे बंधन घालणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक शहरात मोठ्या संख्येने असलेली किराणा, भाजी, बेकरी, मेडिकल आदी दुकानांची सरसकट उघडण्याची दिलेली परवानगी हीच या ब्रेक द चेनला मारक ठरणारी आहे. यामुळे सरसकट लॉकडाऊन हीच संकल्पना महत्त्वाची असल्याचे मत जिल्हा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते महंमद रखांगी यांनी व्यक्त केले. अत्यावश्यक सेवेखाली सरसकट दुकाने उघडल्याने बाजारपेठेत कमी गर्दी असणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने लॉकडाऊन नावाखाली बंद राहत आहेत. यामुळे छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या दुकानांवर खरेदीसाठी दर दिवशी होणारी गर्दी बघता जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने राबवलेला हा लॉकडाऊन खऱ्या अर्थाने उपयोगी ठरेल का, हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:26 AM 03-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here