जीएसबी महागणपतीच्या मूर्तीवर उंचीचं बंधन नको; मंडळाची राज्य सरकारला विनंती

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध जीएसबी सेवा मंडळ सरकारचे सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार आहे. मात्र, जीएसबीच्या गणेशमूर्तीला चार फूट उंचीचे बंधन घालू नये, अशी विनंती मंडळानं राज्य सरकारकडं केली आहे. जीएसबी सेवा मंडळानं तसं निवेदन काढलं आहे. वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा गणेशोत्सव हा मुंबईतील एक प्रमुख उत्सव असतो. सामाजिक अंतर, मुखवटे परिधान करणे, स्वच्छता व इतर निकषांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. भाविकांना मंडपाच्या आत प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय केली जाणार आहे. जीएसबीचा महागणपती हा शाडूच्या मातीचा असतो. पर्यावरणस्नेही अशी ही मूर्ती गेल्या ६५ वर्षांपासून मंडपातच साकारली जाते. मंडपातच कृत्रिम तलाव बनवून तिथंच तिचं विसर्जन केलं जातं. विसर्जन मिरवणूक काढली जात नाही. त्यामुळं जीएसबी महागणपतीच्या मूर्तीवर उंचीचं बंधन असू नये, असं मंडळाचं म्हणणं आहे. राज्य सरकार जीएसबी मंडळाची ही विनंती मान्य करते का, हे पाहावं लागणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:54 PM 03-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here