रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषद कर्मचारी वर्गाची यंदाची दिवाळी त्यांचा आनंद द्विगुणीत करणार आहे. कारण सर्वसाधारण सभेने कर्मचाऱ्यांना घसघशीत सानुग्रह अनुदान देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. रनप कर्मचारी वर्गाला गेल्या ५ वर्षांपासून दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी सानुग्रह अनुदान देण्यास प्रारंभ केला. सुरूवातीला प्रत्येकी १० हजार रूपये देण्यात आले. त्यानंतर १५ हजार रूपये अनुदान देण्यात आले. यावर्षी २० किंवा २५ हजार रूपये देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे कर्मचारीवर्गात आनंद असून, प्रत्येक लाभार्थी सर्व सदस्यांना धन्यवाद देत आहे.
