मोदींच्या अचानक लडाख दौऱ्यानंतर चीन म्हणतो…

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि चीनदरम्यान लडाखजवळील सीमेवर सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर लेहला अचानक भेट दिल्यानंतर चीनकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी मोदींच्या दौऱ्यासंदर्भात बोलताना अगदी मवाळ भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले आहे. भारत आणि चीनमध्ये तणाव कमी करण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. सध्याच्या स्थितीत परिस्थिती चिघळेल अशी कृती कोणीही करत नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजीन म्हणाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here