Miss Universe 2023: शेनिस पॅलासिओस ‘मिस युनिव्हर्स’

0

निकाराग्वाची 23 वर्षाची शेनिस पॅलासिओस (Sheynnis Palacios) मिस युनिव्हर्स 2023 या स्पर्धेची विजेती ठरली आहे.

2023 मिस युनिव्हर्स स्पर्धा शनिवारी पार पडली. या स्पर्धेच्या विजेतीची घोषणा झाल्यानंतर मिस युनिव्हर्स 2022 आर बॉनी गॅब्रिएलने तिचा क्राऊन शेनिस पॅलासिओसला दिला.

आता जगभरातून शेनिस पॅलासिओसचं कौतुक होत आहे.

मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेमधील अंतिम फेरीमध्ये स्पर्धेच्या फायनलिस्टला प्रश्न विचारण्यात आला की, “जर तुम्हाला दुसऱ्या महिलेच्या शूजमध्ये एक वर्ष जगण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का?”.

मिस निकाराग्वा शेनिस पॅलासिओसने अंतिम फेरीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे दिलेले उत्तर हे सर्वात वेगळे होते.तिने उत्तर देताना मेरी वॉलस्टोनक्राफ्ट यांच्या नावाचा उल्लेख केला. मेरी या महिला हक्कासाठी लढलेल्या कार्यकर्त्या आणि स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जातात.

अंतिम फेरीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मिस ऑस्ट्रेलियाने तिला तिच्या आईच्या शूजमध्ये पाऊल ठेवायला आवडेल असे सांगून तिच्या आईचा सन्मान केला. तर मिस थायलंडने उत्तर देताना मलाला युसूफझाई यांचे नाव घेतले. तिने सांगितले की, त्यांचा संघर्ष आणि यश तिला खूप प्रेरणा देतो.

मिस युनिव्हर्स स्पर्धेचे हे विजेतेपद पटकावणारी शेनिस पॅलासिओस ही निकाराग्वाची पहिली महिला ठरली आहे. शेनिसला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा क्राऊन परिधान करताच ती भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले.

थायलंडची अँटोनिया पोर्सिल्ड ही मिस युनिव्हर्स 2023 या सौंदर्य स्पर्धेत पहिली उपविजेती ठरली, तर ऑस्ट्रेलियाच्या मोराया विल्सनला द्वितीय उपविजेतेपदाचा मुकुट देण्यात आला.

90 देशांमधील स्पर्धकांनी यंदा देखील मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभाग घेतला होता.

मिस युनिव्हर्सच्या यूट्यूब चॅनल आणि त्याच्या ट्विटर अकाउंटवरही मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धा ही ऑनलाइन प्रसारित करण्यात आली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 20-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here