प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत १५ डिसेंबरनंतर कृत्रिम पाऊस

0

मुंबई : वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी दिल्लीनंतर मुंबईतही कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे. याचा एकावेळेचा खर्च सुमारे ४० ते ५० लाखांच्या घरात आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वातावरणानेही साथ देणे आवश्यक आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास किमान १५ दिवस तरी मुंबईकरांची प्रदूषणातून सुटका होईल, असा दावा करण्यात येत आहे. मुंबईतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने शहरात सुरू असलेल्या बांधकामांवर अनेक निर्बंध घातले आहेत. एवढेच नाही, तर दररोज पाण्याने रस्तेही धुतले जात आहेत; तरीही प्रदूषणामध्ये फारशी घट झालेली दिसून येत नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासन कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 20/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here