चिपळूण : शहरातील उक्ताड येथील कै.सदाशिव गो.भोसले क्रीडांगणाची अवस्था खूप बिकट झाली आहे. नगरसेवक परिमल भोसले यांनी मुख्याधिकाऱ्यांना सहा महिन्यांपूर्वी यासंदर्भात निवेदनही दिले होते.
परंतु अद्याप क्रीडांगणाची साफसफाई व दुरुस्ती करण्यात आलेली नाही. मुख्याधिकाऱ्यांनी आठ दिवसांत क्रीडांगणाची साफसफाई व दुरुस्ती करुन देतो असे आश्वासन दिले आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मा.खासदार निलेश राणे साहेब तसेच आमदार शेखर निकम यांना क्रीडांगणाची वस्तुस्थिती सांगितली. आ. शेखर निकम यांनी क्रीडांगणाची येऊन पाहणी केली व क्रीडांगणासाठी भरघोस निधी देऊन क्रीडांगण हे खेळण्यासाठी चांगल्या सोयी सुविधा देऊ असा शब्द दिला. यावेळी भाजपचे पदाधिकारी जिल्हाध्यक्षा सुरेखा खेराडे, परिमल भोसले, सतीश मोरे, विनोद कदम, सुधीर पानकर, विनोद सुर्वे, संदेश भालेकर, उदय घाग, संदीप सुखदरे, उल्हास भोसले, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, किसन चिपळूणकर, अमोल निर्मल, नगरपरिषदेचे प्रशासकिय अधिकारी अनंत मोरे, मंगेश पेढांबकर, वैभव निवाते, उक्ताड कानसेवाडीमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 20-11-2023
