शिक्षक भरतीमध्ये होणार कुणबी प्रमाणपत्राचा लाभ

0

जळगाव : राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांना ओबीसीचा फायदा मिळेल. शिक्षकांची कमतरता असल्याने शाळांवर जो परिणाम झाला आहे, तो गृहित धरता लवकरात लवकर भरती होईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

रविवारी सकाळी जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी ते बोलत होते.

शिक्षकांची भरतीप्रक्रिया व दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी, यामुळे भरती प्रक्रियेवर काही परिणाम होईल का, या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले, भरती प्रक्रिया करत असताना अनेक ठिकाणी आरक्षित जागा या खुल्या प्रवर्गात टाकल्यामुळे खुल्या जागांची संख्या कमी झाली होती. आम्ही प्रयत्नपूर्वक या सर्वांची पाहणी करून खुल्या जागा वाढविल्या. याबाबत मराठा समाज संघटनांचीही मागणी होती. यामुळे खुल्या प्रवर्गात पुरेशा जागा उपलब्ध झाल्या. ईडब्लूएस आरक्षणाचा फायदा या भरतीमध्ये मिळेल. तसेच, मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. जे खुल्या प्रवर्गात आहेत त्यांना त्यातून संधी आहेच, मात्र ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसीचा फायदा मिळू शकेल, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 20-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here