रत्नागिरीतून क्रिकेटपटू घडावेत : प्रवीण आमरे

0

जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरीतून आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू घडावेत. येथे क्रिकेटसाठी लागणारी मदत करण्यास आपण तयार असल्याचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी सांगितले. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरील रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष किरण सामंत, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोशियन सचिव बिपीन बंदरकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी, उपाध्यक्ष दीपक देसाई, दीपक पवार, सईद मुकादम, बलराम कोतवडेकर, रमेश कसबेकर, मनोहर गुरव, राजेश सुतार हे उपस्थित होते.

यावेळी प्रवीण आमरे यांनी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोशियनला कुठलीही मदत लागल्यास मी सदैव तयार आहे. कारण रत्नागिरी हे माझे गाव असल्याने या गावातून जर क्रिकेटर घडले तर मला आनंदच होईल.. तसेच छत्रपती शिवाजी स्टेडियम मैदानाचे काम चालू आहे. त्यातही कुठली मदत लागल्यास मी करण्यास तयार आहे, असे आश्वासन आमरे यांनी दिले.

या वेळी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन १४ वर्षांखालील मुलांचा क्रिकेट संघ त्यांच्या स्वागताला हजर होता. काही दिवसानंतर स्वतः प्रवीण आमरे हे मुलांना प्रशिक्षण देणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 20/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here