दाभोळ : दापोली पोलिसांनी बेकायदा दारू विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडली आहे. या मोहिमेत बेकायदा दारू जवळ बाळगल्याप्रकरणी २ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील विसापूर पाथरी कॉड येथे विनापरवाना देशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. पालगड पोलिस दरक्षेत्रातील उपनिरीक्षक मिलिंद चव्हाण व कॉन्स्टेबल विकास पवार यांनी १८ नोव्हेंबरला दुपारी १२.३० च्या सुमारास विसापूर पाथरी कॉड येथील एका मोकळ्या इमारतीमध्ये एकजण बॉक्स जवळ घेवून बसलेला आढळला. या बॉक्सची तपासणी केली असता त्यात १ हजार ५० रुपयांच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्या जप्त करण्यात आल्या आहेत. राजेश सखाराम बामणे (वय ४४, रा. विसापूर पाथरीकोंड) असे संशयिताचे नाव आहे. दुसरा गुन्हा आंजर्ले समुद्रकिनारी पडला आहे. समुद्रकिनारी गावठी दारू जवळ बाळगल्या प्रकारणी संशयित सुभाष दत्तात्रय भाटकर (वय ७०, रा. आंजर्ले भंडारवाडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 20-11-2023
